सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शिववाडीत एका बांधकाम सुरू असलेल्या घरात बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. पाईप घेण्यासाठी गेलेल्या नाथ बेंद्रे यांच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तात्काळ बिबट्याला घरात बंद करून वन विभागाला कळवले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.