सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याने साई दरबारी हजेरी लावीत साई समाधीवर माथा टेकवत मनोभावे दर्शन घेतले आहे. पहिल्यांदाच शिर्डीला आल्याचे सांगताना आकाश याने साई मंदिर परिसरात अगदी प्रसन्न वातावरण असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अभिनेता आकाश ठोसर याचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.