देशातील विविध वाहननिर्मिती कंपन्या तसेच डिलर्स यांच्यात साईबाबा संस्थानला वाहन देणगी देण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे येथील साई पॉईंट ऑटोमोबाईल्सचे सर्वेसर्वा दिलीप पाटील यांनी होंडा कंपनीच्या नऊ इलेक्ट्रिक दुचाकी वाहने साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण केली आहेत. तसेच अहमदाबाद येथील साईभक्त अनुज गर्ग यांनी कैलासवासी श्रीनाथ मोहन यांच्या पवित्र स्मरणार्थ एक इलेक्ट्रिक बग्गी साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहे. या सर्व वाहनांचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.