सलग जोडून सुट्ट्या आल्याने देशभरातून साईभक्त शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल झाले आहेत. वाढत्या गर्दीमुळे वाहतूक आणि दर्शन व्यवस्थेवर ताण पडला आहे. त्यामुळे साई संस्थान, पोलीस आणि नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून शिर्डीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. शहरातील हॉटेल हाऊसफुल झाले असून पुढील दोन-तीन दिवस ही गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.