नाताळच्या सुट्टया, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झालीय..ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली असून पुढील आठ दिवस शिर्डीत भाविकांची मांदियाळी असणार आहे.. साईदर्शनानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून कुटुंबियांसोबत सुकर दर्शन होत असल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतय.