शिर्डीच्या साईबाबांवर अढळ श्रद्धा असलेल्या हैदराबादच्या साईभक्त के.एस.एस. भगवान यांनी साईचरणी २३.६० लाख रुपये किमतीचा, १९३ ग्रॅम वजनाचा सुवर्ण-हिरे जडीत हार अर्पण केला. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते या दानशूर भक्ताचा सत्कार करण्यात आला. भक्तांच्या अफाट श्रद्धेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.