साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन दुर्ग येथील साईभक्त गितीका सहाणी यांनी शिर्डी साई चरणी १ लाख ५४ हजार २५३ रुपये किमतीचे, १३.१०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गुलाबाचे फूल अर्पण केले आहे. देश-विदेशातील भाविक विविध प्रकारे साईबाबांना देणग्या देतात, त्यापैकी ही एक मौल्यवान देणगी आहे. साई संस्थानने गितीका सहाणी यांचा सत्कार केला.