शिर्डी येथील साईबाबांच्या मूर्तीची झीज झाल्याच्या चर्चांवर तज्ज्ञांनी पूर्णविराम दिला असून, मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल सादर केला आहे. इटालियन मार्बलची ही मूर्ती सुस्थितीत असली तरी, तिच्या देखभालीसाठी रसायनांचा वापर टाळण्यासह काही महत्त्वाच्या सूचना तज्ज्ञ समितीने दिल्या आहेत.