नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतील साई मंदिर 31 डिसेंबर रोजी भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. गर्दीच्या संभाव्यतेमुळे साईबाबा संस्थानने विशेष तयारी केली असून, 31 डिसेंबरची शेजारती आणि 1 जानेवारीची काकड आरती रद्द करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी निवास, प्रसाद आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.