शिर्डीत साईभक्तांसाठी गोड बातमी समोर आली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक विविध प्रकारच्या देणग्या देत असतात. मात्र यावेळी पुणे जिल्ह्यातील नारायणबाग येथील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांनी साईंच्या चरणी तब्बल साडेतीन हजार किलो केशर आंब्यांचे दान दिले आहे. या आंब्यांपासून साई संस्थानच्या प्रसादालयात थंडगार आमरस तयार करण्यात आला असून पुढील तीन दिवस साईभक्तांना आमरस-पुरीची खास मेजवानी देण्यात येतेय.