शिरूर तालुक्यातील चांडोह येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीवेळी शर्यतीचा बैल उधळल्याची घटना घडली. बैलगाडा जुपतेवेळी या चावरेकरी बैलाने अनेक जुपनेकरींना शिंगावर घेतल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे.