शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाटपामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत मुखई, जातेगाव, करंदी व शिक्रापूर परिसरातील शेतकऱ्यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी "पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.