शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावाला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड उन्मळून पडून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या तारांवर कोसळले. या घटनेत फिडरच्या तारा तुटून जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.