छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक इथं मध्यरात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत क्रांती चौक परिसर भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. घड्याळाचे काटे 12 वर पोहोचताच घोषणांचा निनाद सुरू झाला आणि भव्य आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला.