अकोला : महाशिवरात्री निमित्त शहरात आज रात्री शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.तर राजराजेश्वर मंदिरातून महादेवाची भव्य मिरवणूकही काढण्यात आली असून अंबिका माता मंदिर परिसरात पारंपरिक विधींसह विवाह संपन्न झाला आहे. या सोहळ्यातील विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या वेशभूषेतील उपस्थिती आकर्षण ठरली. विवाह सोहळा पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती.