लातूर जिल्ह्यातल्या लोदगा इथ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. ओमराजे नेहमी आपल्या भाषणात मी संकट काळात जॅक आणि टॉमी पोहोचविणारा कार्यकर्ता आहे असे म्हणायचे. त्यामुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी आज टायर पंचर झाल्यावर वापरात येणाऱ्या जॅक आणि टॉमी याचा जाहीर सत्कार करुन खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.