डोंबिवली पॅनल क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून मोठा गोंधळ झाला आहे. तुकाराम नगरातील दशरथ भुवनमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी 3 हजारांची पाकिटे वाटल्याचा आरोप करत शिवसेना उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. या प्रकरणाचा पंचनामा पोलीस ठाण्यात न करता घटनास्थळी करावा अशी मागणी करत शिवसेना उमेदवाराने इमारतीखाली ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून निवडणूक आयोगाचा तपास सुरू आहे.