धाराशिवमध्ये शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना 101 गीर गाईंचं वाटप करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे वाटप झालं. जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यात पुरामध्ये शेतकऱ्यांची दुभती जनावरं वाहून गेली होती.