नगरपरिषदेच्या निवडणक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला वेग आलाय. त्यामुळे रत्नागिरीत शिवसेनेकडून पदयात्रेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार राजीव कीर आणि नगरसेविका पदाच्या उमेदवार मेधा अविनाश कुळकर्णी यांच्या प्रचारार्थ या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.