धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच वातावरण तापलं आहे. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. घरावर दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.