लासलगाव बाजारात कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000 रुपयांच्या आत पोहोचले आहेत. कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) आणि छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी शोले स्टाइल आंदोलन केलंय.