भास्कर जाधव यांनी आज चिपळूणमध्ये बस लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बस चालवली. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या हातात बसचं स्टेरिंग घेतलं आणि फेरफटका मारला. भास्कर जाधव यांच्यासोबत गाडीमध्ये विद्यमान आमदार शेखर निकम देखील बसले होते. तर भास्कर जाधव यांच्या हातात स्टेरिंग असताना कोणतीही भीती नाही, असं शेखर निकम म्हणाले.