साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून झालेल्या कथित धक्काबुक्कीचे पडसाद आता जिल्ह्याच्या राजकारणात तीव्रतेने उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज साताऱ्यात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला.