सातारा : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका अवलिया चित्रकाराने अक्षरशः स्वतःचे रक्त वापरून महाराजांचे चित्र कागदावर रेखाटले आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या अभिवादनाचा प्रयत्न सध्या शिवप्रेमी मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कराड तालुक्यातील सैदापूर येथील शेतीमित्र कलावंत संदीप डाकवे यांनी स्वःच्या रक्ताने कुंचल्यातून चित्र रेखाटून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केलीय. विशेष म्हणजे संदीप डाकवे शिवजयंतीदिनी रक्तदान करणार आहेत. संदीप डाकवे यांनी स्वतःच्या रक्तातून रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कलाकृतींचे सर्वत्र कौतुक होत आहे.