छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदेडमध्ये शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून तसेच पुष्पहार अर्पण करत शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले. 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.