छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले होते. मात्र ध्वजावंदनानंतर एक वेगळेच चित्र दिसले. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते संजय शिरसाठ, संजय केणेकर, चंद्रकांत खैरे यांनी 'चाय पे चर्चा' केली. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप विसरून ते एकाच टेबलावर गप्पा मारताना दिसले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.