अमरावती शिक्षक मतदार संघातून शिवसेनेचे किरण सरनाईक यांचा विजय झाला आहे. सरनाईकांच्या विजयानंतर शिक्षकांवरील सामान्य नागरिकांच्या गप्पांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन लाख पगार असताना दहा हजारात विकले गेले अशी चर्चा सुरु आहे. शिक्षकी पेशाला कलंकीत केलं, शिक्षकांच्या प्रतिमेला धक्का लागला अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओमध्ये काही नागरिक सगळं सुनावत असल्याचं दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ अमरावती जिल्ह्यात वायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.