राज्य सरकारच्या भ्रष्टाचारविरोधात अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाकडून आज मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करत असंख्य कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले, मात्र प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना थांबवले. यामुळे संतापाचा माहोल निर्माण झाला आणि आंदोलन अधिक चिघळले.