बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा असे नामकरण करून ठाकरे यांच्या शिवसेनेनं अनोखे आंदोलन केलं आहे. या रुग्णालयातील कर्मचारी ,डॉक्टरा कडून रुग्णालयात आलेल्या रुग्णांना चुकीची वागणूक दिल्या जाते, रुग्णालयात डॉक्टर वेळेवर हजर नसतात. रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नाही, तसेच डिलेव्हरी पेशंट, किरकोळ तपासणी करता सुद्धा बुलढाण्याला रेफर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.