भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. इतकंच नाहीतर त्यांनी ठाकरे बंधूंवर देखील निशाणा साधला आहे. हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना देखील मारून दाखवा. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो. यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.