शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर एका व्यक्तीने चक्क बंधाऱ्याच्या मध्यभागी दुचाकी नेऊन ती धुत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाण्याचा वेग आणि अरुंद रस्ता लक्षात घेता हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते.