पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला असून, रस्त्यालगतची विहिर उघडी पडल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मात्र गेली 10 दिवस बंद असलेला रस्ता दुरुस्त करण्याऐवजी नगरपरिषदेकडून संबंधित शेतकऱ्यालाच नोटीस बजावत होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार धरले आहे.