वाशिम जिल्ह्यात एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट संदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली असून आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण १ लाख २१ हजार ५९६ वाहनांपैकी आतापर्यंत फक्त ५४ हजार ५९६ वाहनांचीच नोंदणी झाली आहे. तर तब्बल ६७ हजार वाहनधारकांनी मुदत संपूनही एचएसआरपी बसविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांची ओळख पटवणे, चोरी रोखणे आणि सुरक्षेसाठी ही प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित वाहनधारकांनी तातडीने नोंदणी करून एचएसआरपी बसवावी असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.