पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात चिकन विक्रेत्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. चिकन विक्रेता चक्क रस्त्यावर पडलेला चिकन गोळा करून विक्रीसाठी नेत असताना दिसत आहे. मात्र त्याच वेळी त्याच्या एका पिशवीतील चिकनचे तुकडे रस्त्यावर खाली पडल्याने तो पुन्हा तो रस्त्यावर पडलेला चिकन गोळा करून पिशवीत टाकताना दिसत आहे.