मुंबई-गोवा महामार्गावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागोठणे ते खेड दरम्यान अनेक पंपांवर इंधन नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत.