मुंबई-गोवा महामार्गावरील रोहा तालुक्यातील कानसई येथील ‘म्हसोबा स्नॅक्स सेंटर’मध्ये सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. लाकूड जाळून स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे स्वयंपाकी आणि कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.