इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला असातना भारतावर देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शहापूर तालुक्यामध्ये व्यवसाय सिलेंडरचा तुटवडा असल्याने छोटे-मोठे खानावळ धारक तसेच हॉटेल धारकांवर लाकडीचूल पेटवण्याची वेळ आलेली आहे. लाकडी चूल पेटवून खानावळ तात्पुरत्या स्वरूपात का होईना आपले हॉटेल चालवत आहेत.