खरीप हंगाम सुरू झाला असून मशागतीला ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आहे, मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या पेट्रोल पंपावर डिझेल साठी ड्रम आणि कॅन घेऊन रांगा लावाव्या लागत आहेत.