आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम धुळ्यात देखील होऊ लागला आहे. हॉटेल मालकांना व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने, त्यांनी आता लाकडे खरेदी करून चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आहे. लाकडांच्या वखारीवर लाकडं खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.