कांदारोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या नाशिकच्या ग्रामीण परिसरात उन्हाळ कांदा लागवड सुरु आहे. मात्र, परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा तसेच मजुरांची टंचाई असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी शेतकऱ्याची कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झालीत. काहींनी दुबार तर काहींनी तिबार रोप टाकलीत.