वसई विरार महानगरपालिकेतील विविध विभागांतील प्रलंबित मागण्यासाठी श्रमजीवी कामगार संघटनेने पालिकेच्या मुख्य कार्यालयात गुरूवारी ठिय्या आंदोलन केले. सफाई कामगारांचे थकीत रजेचे पैसे, ग्रॅच्युइटी, ईएसआयसी सुविधा, रेनकोट, गणवेश तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.