श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील (अहिल्यानगर) पाथर्डी तालुक्यात, गर्भगिरी डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या अतिशय पुरातन वृद्धेश्वर शिव मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून भाविक येथे येतात.