सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने स्विमिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीने 3 सुवर्णपदकांसह हॅट्रिक केली आहे. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्लीत राष्ट्रीय स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा पार पडली.