आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस होता. संपूर्ण देशामध्ये श्रावणी सोमवारचा पहिला जास्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्यानिमित्त आज गोंदियातील आमगाव येथे श्रावणी सोमवार औचित्य साधून भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली. वाघ नदी येथे नदी किनाऱ्यावर शिवलिंग काढून शिवलिंग चे अभिषेक करून कावड यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मुले, युवक, युवती, महिला आणि पुरुष यांच्या समावेश होता. हर हर महादेव, बम बम भोले यांच्या गजरात या कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली होती.