करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे श्री भैरवनाथ महाराज यांची वार्षिक यात्रा उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. 'भैरवनाथाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजरात अवघे वाशिंबे गाव भक्तीसागरात न्हाऊन निघाले.