सातारा सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि कृषि विभागाने आयोजित केलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेतीमधील AI तंत्रज्ञानाचा विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या ठिकाणी ऊस पीक परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले. प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळत देण्यात आली असल्याची माहिती मंडल कृषि अधिकारी श्री. अक्षय सावंत यांनी दिली.