नाताळ सणाच्या सुट्ट्या सुरू झाल्याने पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नाताळ सुट्टी आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून भाविकांची संख्या वाढली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळणार आहे.