श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात सुरुवातीला काही मान्यवरांची नावे घेण्यास विसरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी डोंबिवलीचे आमदार व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वेच्या आमदार गायकवाड मॅडम आणि जिल्हाधिकारी साहेब उपस्थित असल्याची नोंद घेतली. वेळेअभावी सर्वांचा उल्लेख शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.