भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह उत्साहात सुरू असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. २३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात कथावाचक भागवताचार्य ह.भ.प. कु. कांचनताई शिवानंद ओळके यांच्या प्रभावी कथाकथनाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.