सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथील श्रीनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचे मैदान पार पडले. छोट्या मोठ्या अशा पन्नास हून अधिक कुस्त्या यावेळी पार पडल्या.यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरल्या,त्या लहान मल्लांच्या कुस्त्या.जवळपास 50 हून अधिक लहान मल्लांनी या कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.